छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मैत्रिणीसोबत दुचाकीने घराकडे निघालेल्या महिलेच्या गळ्यातील साडेचार तोळे सोन्याचे गंठण दुसर्या दुचाकीवर आलेल्या दोन चोरटयांनी हिसकावल्याची घटना रविवारी (दि.२५) रात्री ९.२० वाजेच्या सुमारास बीड बायपास रस्त्यावरील बेंबडे हॉस्पिटलच्या बाजूला घडली.
अर्चना अजयकुमार शुक्ला (४९) रविवारी रात्री सव्वा नऊच्या अय्यप्पा मंदिरजवळ विनायक येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम असल्याने त्या मैत्रीण लता त्रिवेदी यांच्यासोबत आल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर मोपेडने रात्रीच्या सुमारास बीडबायपास रस्त्याने दर्गाकडे जात असताना बेंबडे हॉस्पिटलजवळ येताच त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर दोघेजण आले. त्यातील मागे बसलेल्या चोरट्याने अर्चना यांच्या गळ्यातील साडेचार तोळ्याचे गंठण ज्याचे बाजारमूल्य ७ लाख रुपये आहे ते हिसकावले. त्यांनी आरडाओरड केली, मात्र चोरटे संग्रामनगर पुलाकडे पसार झाले होते. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात दोघीजणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











